Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार आहे. यासाठीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली जाणार असल्याचं, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगण्यात आलं.

हिवाळी अधिवेशन येत्या सात डिसेंबर पासून नागपूर इथं घेण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता, मात्र कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, हे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

Exit mobile version