Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पुणे विभागातील 5 लाख 11 हजार 417 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी, विभागात कोरोना बाधित 5 लाख 40 हजार 588 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे:- पुणे विभागातील 5 लाख 11 हजार 417 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 40 हजार 588 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 66 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 105 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.60 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 3 लाख 46 हजार 345 रुग्णांपैकी 3  लाख 27 हजार 123 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 10  हजार 848 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 374  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.42 टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  94.45 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 51 हजार 659 रुग्णांपैकी 49 हजार 334 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  599 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 726 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 500 रुग्णांपैकी 42 हजार 952 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1  हजार 931 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 617  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 46  हजार 952  रुग्णांपैकी 44 हजार 851 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 400 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1  हजार 701 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 49 हजार 132 रुग्णांपैकी 47  हजार 157 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  288 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 687  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 1 हजार 149  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 812, सातारा जिल्ह्यात 137, सोलापूर जिल्ह्यात 138, सांगली जिल्ह्यात 40 तर कोल्हापूर जिल्ह्यात 22 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणाया रुग्णांचे प्रमाण –

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 638 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 113, सातारा जिल्हयामध्ये 179, सोलापूर जिल्हयामध्ये 257, सांगली जिल्हयामध्ये 48 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 41 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 29 लाख 33  हजार 104 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख  40 हजार 588  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि.  4 डिसेंबर 2020 रोजी रात्री  9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Exit mobile version