मुंबईत एकूण चाचण्यांमधून बाधित रुग्ण आढळण्याचा दर ५ टक्क्यावर आला
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल तब्बल १ हजार २५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत २ लाख ५९ हजार १३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९१ टक्क्यावर पोचला आहे. काल ८१३ नवीन रुग्णांची नोंद झाली.
आतापर्यंत मुंबईतली रुग्णांची संख्या २ लाख ८४ हजार ५०२ झाली आहे. मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी २४३ दिवसांवर आला आहे, तर एकूण चाचण्यांमधून पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचा दर ५ टक्क्यावर आला आहे. सध्या १२ हजार ९२६ रुग्ण उपचार घेत आहेत. काल १४ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांचा आकडा १० हजार ८७१ वर पोचला आहे.