बेकायदेशीररित्या नियुक्त केलेल्या डेटा एन्ट्री प्रशिक्षणार्थीची निवड रद्द करा
Ekach Dheya
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या वतीने कोव्हीड १९ करीता डेटा एन्ट्री करणेकामी, मानधनावर करण्यात आलेली बेकायदेशीर भरती रद्द करण्यात यावी. व त्याजागी यावर्षीकरीता मनपा मध्ये कोपा पासा प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणाची नियुक्ती करण्यात यावी.
गेल्या महिन्यात सदर सदर प्रशिक्षणार्थी मुदत संपत आल्यानंतर आपण पदवीधर निवडणूक आचारसंहितेचे कारण देऊन मुदतवाढ दिली नाही. आणि सदर आचारसंहिता चालु असताना सुद्धा मागील आठवड्यात त्यांना नियुक्ती दिली. थोडक्यात सदर नियुक्ती करताना संबंधित विभागाच्या वतीने मनमर्जी कारभार सुरु आहे असे वाटते तसेच संबंधित विभागाला शासनाच्या भरती आदेशाचे नियम लागु होत नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तसेच कोपा पास प्रशिक्षणार्थी यांना नियुक्त करण्याचे आदेश अथवा नियम असताना जुन्या प्रशिक्षणार्थी यांची भरती करून नव्या उमेदवाराला वा-यावर सोडण्याचे काम संबंधित विभाग करीत आहे. तसेच काही दिवसापूर्वी याच नियुक्ती उमेदवारातील १० उमेदवारांना काढुन टाकण्यात आली यावरून असे निदर्शनास येते की , संबंधित विभागातील अधिकारी यांना आपल्या पसंतीच्या उमेदवारांना संधी द्यायची का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी सदर भरती ही बेकायदेशीर असुन संबंधीत भरती रद्द करून संबंधित भरतीची चौकशी करण्यात यावी.