युनियन बँक ऑफ इंडियाला एबीसीआयद्वारे ९ पुरस्कारांनी सन्मानित
Ekach Dheya
मुंबई:युनियन बँक ऑफ इंडियाला मुंबई येथील इंडियन मर्चंट चेंबर्स येथे आज विविध गटात असोसिएशन ऑफ बिझनेस कम्युनिकेटर्स ऑफ इंडिया (एबीसीआय) तर्फे चँपियन ऑफ चँपियनसह ९ पुरस्कार मिळाले. बँकेचे त्रैमाकसिक कॉर्पोरेट हाऊस मॅगझीन “‘युनियन धारा’’ आणि हिंदी हाऊस मॅगझीन ‘‘ युनियन श्रीजन”साठी हे पुरस्कार मिळाले.
एबीसीआयचे प्रमुख पाहुणे प्रशांत करुलकर यांच्याकडून युबीआयचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मानस रंजन बिसवाल यांनी हे पुरस्कार स्वीकारले. त्यांच्यासोबत चीफ जनरल मॅनेजर ब्रजेश्वर शर्मा, चीफ जनरल मॅनेजर कल्याण कुमार, डेप्युटी जनरल मॅनेजर (अधिकृत भाषा) अंबरीश कुमार सिंग आणि एडिटर युनियन धारा आणि युनियन श्रीजन, डॉ. सुलभा कोरे हेदेखील कार्यक्रमात उपस्थित होते.
अंतर्गत मासिक, भारतीय भाषिक प्रकाशन, द्वैभाषिक प्रकाशन, विशेष स्तंभ (इंग्रजी), फीचर्स (भाषा), विशेष स्तंभ (भाषा), फोटोग्राफी, फोटो फीचर आणि इल्युस्ट्रेशन अशा विविध गटांमध्ये बँकेला १ सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कांस्य पदक मिळाले. सर्वात मोठा पुरस्कार विजेता असल्याने युनियन बँक ऑफ इंडियाला चँपियन ऑफ चँपियनची ट्रॉफी मिळाली.