Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पुणे विभागातील 5 लाख 12 हजार 482 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,विभागात कोरोना बाधित 5 लाख 41 हजार 706 रुग्ण-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे :- पुणे विभागातील  5  लाख 12  हजार 482 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5  लाख 41  हजार 706 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 14  हजार  97 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15  हजार 127  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण  94.61 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  3 लाख 47  हजार 130 रुग्णांपैकी  3   लाख  27  हजार 824  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण  10  हजार 920  आहे. कोरोनाबाधित एकूण 8  हजार 386  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.42  टक्के इतके आहे तर बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण  94.44  टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण  51  हजार 774 रुग्णांपैकी  49 हजार 523  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  519 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार  732 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 665 रुग्णांपैकी  43 हजार 59  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1   हजार 986 आहे. कोरोनाबाधित एकूण 1  हजार 620  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 46  हजार  993 रुग्णांपैकी 44 हजार 888 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 403 आहे.  कोरोनाबाधित एकूण 1  हजार 702 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 49 हजार 144 रुग्णांपैकी 47  हजार  188 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 269   आहे. कोरोनाबाधित एकूण  1 हजार 687  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 118 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 785 , सातारा जिल्ह्यात 115, सोलापूर जिल्ह्यात 165, सांगली जिल्ह्यात 41 तर कोल्हापूर जिल्ह्यात 12 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणाया रुग्णांचे प्रमाण –

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या एकूण  1हजार 65 रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 701, सातारा जिल्हयामध्ये 189, सोलापूर जिल्हयामध्ये  107, सांगली जिल्हयामध्ये  37 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 31 रुग्णांचा समावेश आहे.


पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 29 लाख  47 हजार  683 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी   5 लाख  41 हजार 706  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि.  5 डिसेबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Exit mobile version