मुंबई (वृत्तसंस्था) : कार्तिकी वारी आणि माउलींच्या संजीवन समाधी सोहोळ्यासाठी आळंदीत भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आजपासून पुढचे १० दिवस आळंदी आणि परिसरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयानं घेतला आहे.
कार्तिकी वारीच्या निमित्तानं पंढरपूरातून येणाऱ्या मानाच्या ३ दिंड्यांसमवेत प्रत्येकी केवळ २० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय संजीवन समाधी सोहोळ्याला वारकऱ्यांनी गर्दी करु नये, म्हणूनही काही ठराविक मान्यवरांना पास देण्यात येत आहेत. आगामी १४ तारखेपर्यंत माउलींच्या संजीवन समाधीचा सोहोळा चालणार असल्यानं १६ तारखेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.