Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अहोरात्र काम सुरू- विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर

पुणे : कोल्हापूर व सांगली येथील पूरस्थिती निवळत असून पुनर्वसनाच्या दृष्टीने वेगवेगळ्या विभागाची पथके अहोरात्र काम करीत आहेत. पुरामुळे मृत झालेल्या व्यक्तींची संख्य 50 एवढी झाली असून शक्य तितक्या लवकर जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहेअशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
आजही आपण सर्व यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. काम मोठे असले तरी सर्वांना विश्वासात घेऊन यंत्रणा काम करीत आहेअसे स्पष्ट करून डॉ. म्हैसेकर यांनी खालीलप्रमाणे अधिक माहिती दिली.
पर्जन्यमान
सांगली जिल्ह्यामध्ये आजअखेर एकूण 539.86 मि.मी.इतका पाऊस झालेला असून आजअखेरच्या सरासरी पर्जन्यमानाची तुलना करता 217.66%  इतका पाऊस पडला आहे.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजअखेर झालेला पाऊस 1663.71 मि.मी झालेला असून आजअखेरच्या सरासरी पर्जन्यमानाची तुलना करता 126.90%  इतका पाऊस पडला आहे
महत्त्वाच्या स्थळातील पाण्याची पातळी 
आयर्विन पूल :- येथील धोका पातळी 45’00” आहेती आज दुपारी 4 वाजेपर्यंत 39’01”  इतकी आहे.
राजाराम बंधारा :- येथील धोका पातळी 43’00” आहेती आज दुपारी 4  वाजेपर्यंत 41’6”  आहे.
स्थानांतरित कुटुंब / व्यक्ती माहिती
सांगली जिल्ह्यामध्ये 4 तालुक्यातील 104 गावे बाधित झाली असून यामधील 69067 कुटुंबातील 3,11,220 व्यक्ती सध्यास्थानांतरित आहेतया स्थानांतरित व्यक्तीसाठी आज एकूण 138 तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 तालुक्यातील 321 गावे पुरामुळे बाधित झालेली असून स्थानांतरित व्यक्तींची संख्या 3,58,091 इतकी आहे  त्यांच्या साठी 224 तात्पुरते निवारा केंद्र सुरु आहे.
पुरामुळे वेढलेली गावे
सांगली जिल्ह्यामध्ये मिरज  वाळवा या 2 तालुक्यातील एकूण 3 गावांचा संपर्क तुटला असून या गावातील एकूण 4510  लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेले आहे.
कोल्हापूरमध्ये ‍शिरोळगगनबावडाकरवीर  हातकणंगले या 4 तालुक्यातील एकूण 16 गावांचा संपर्क तुटल्याने यामधील 47, 401 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
पुरामुळे मयत :-
पुणे विभागातील 5 जिल्ह्यांतील एकूण 50 व्यक्ती मृत पावल्या असून बेपत्ता व्यक्तींची संख्या 3 इतकी आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 24, कोल्हापूरमधील 10, सातारामधील 8, पुणेमधील 7 आणि सोलापूरमधील 1 मयत व्यक्तींचा समावेश आहे. तरसांगली  कोल्हापूर जिल्हयातील अनुक्रमे 1  2 व्यक्ती बेपत्ता आहेत.
मृत पावलेली जनावरे
 
पुणे विभागात पुराच्या तडाख्यात गाय  म्हैस वर्गीय 7847 जनावरे, 1065 शेळयामेंढया तर 166 लहान वासरे गाढवांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयात 4350 गाय  म्हैस वर्गीय जनावरे, 500 शेळयामेंढया, 80 लहान वासरे  गाढवांचा समावेश आहे.
 
कोल्हापूर जिल्हयात 3420 गाय  म्हैस वर्गीय जनावरे, 300 शेळयामेंढया, 50 लहान वासरे  गाढवांचा समावेश आहे.
 
पुणे जिल्ह्यात 60 गाई  म्हैस वर्गीय जनावरे, 250 शेळयामेंढयातर 30 लहान वासरे  गाढवांचा समावेश आहे.
 
सातारा जिल्ह्यात 17 गाय  म्हैसवर्गीय जनावरे, 15 शेळयामेंढया तर 6 लहान वासरे  गाढवांचा समावेश आहे.
घरांची पडझड :-दिनांक 13/8/2019 पर्यंत
 
सांगली जिल्हयामध्ये पूर्णत :पडझड झालेल्या घरांची संख्या 11 असून या व्यतिरिक्त 1350 घरांची अंशत : पडझड झालेली आहे.
 
कोल्हापूर मध्ये पूर्णत : पडझड झालेल्या घरांची संख्या 496 असून या व्यतिरिक्त 8478 घरांची अंशतपडझड झालेली आहेतसेच 316 गोठयाची पण पडझड झाली आहे.
मदत  बचाव कार्य :-
सांगली जिल्ह्यामध्ये NDRF यांची एकूण 8  पथके कार्यरत आहेतबचाव कार्यासाठी 20 बोटी  176 जवान कार्यरत आहेत.
 
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये NDRF, SDRF   NAVY यांची एकूण 18 पथके  68 बोटी  388 जवान  कार्यरत आहेत.
 
वैद्यकीय पथके :-
 
सांगली जिल्हयामध्ये 107, कोल्हापूर मध्ये 150  सातारा जिल्हयामध्ये 72 असे एकूण 329  वैद्यकीय पथके सध्या कार्यरत आहेत.
 
सहाय्यता निधी  मदत वाटप :-
 
मुख्यमंत्री सहायता निधी करीता पुणे विभागीय आयुक्त कार्यालय मध्ये आतापर्यंत व्यक्ती/संस्था यांनी एकूण 6,25,000 इतक्या रकमेचे धनादेश सूपुर्त केले आहेत.
 
या व्यतिरिक्त कपडेबिस्कीट पाकीटेपाण्याच्या बॉटलदुध पावडर पाकीटेमेणबत्त्यासोलार लाईट  तातडीच्या उपचारासाठी आवश्यक औषधे इत्यादी  विविध स्वरुपामध्ये मदत विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त होत आहे.
 
आजपर्यंत सांगलीसाठी 43 ट्रक  कोल्हापूरसाठी 40 ट्रक असे एकूण 83 ट्रकद्वारे साहित्य पोहचविण्यात आलेले आहे.
महावितरण :- दिनांक 13/8/2019 पर्यंत
 
सांगली जिल्हयातील 10 – उपकेद्र, 1400 – टान्सफॉर्मर  86115 ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरु केला आहे.
 
तसेच कोल्हापूर जिल्हयातील 24 – उपकेंद्र, 2886- टान्सफॉर्मर  1,88,699 ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरु केला आहे.
कोल्हापूर  सांगली जिल्हयातील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पुणेबारामती  सातारा येथून 48 पथके  कोल्हापूर येथे  12 पथके सांगली येथे कार्यरत आहेत.वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्धकेलेले आहे.
बँकीग सेवा :-
सांगली जिल्हयातील एकूण 329 एटीएम पैकी 209 एटीएम सुरु करणेत आले आहेततथापि, 120 एटीएम अद्यापही बंद आहेत.
 
कोल्हापूर जिल्हयातील एकूण 647 एटीएम पैकी 390 एटीएम सुरु करणेत आले आहेततथापि, 257 एटीएम अद्यापही बंद आहेत.
बंद पुल  बंद रस्त्यांची माहिती :-
 
सांगली जिल्हयामध्ये एकुण 23 रस्ते बंद आहेततसेच पुराच्या पाण्यामुळे 13 पुलावरील वाहतूक सुध्दा बंद आहे.
 
कोल्हापूर जिल्हयामध्ये एकुण 37  रस्ते बंद आहेततसेच पुराच्या पाण्यामुळे 13 पुलावरील वाहतूक सुध्दा बंद आहे.
एस. टी. वाहतूक :-
 
सांगली जिल्हयामध्ये अद्यापही 30 मार्ग बंद आहेतकोल्हापूर जिल्हयातील अद्यापही 8 मार्ग बंद आहेत.
 
टिप:- वर नमूद माहिती दिनांक 13/8/2019 रोजीपर्यंतची आहे
Exit mobile version