Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिनानिमित्त प्रत्येक स्तरावर पारदर्शकता राखण्याची प्रतिज्ञा करू – एम व्यंकय्या नायडू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन आहे. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जनजागृती करण्याच्या हेतून २००५ पासून दरवर्षी हा दिवस पाळला जातो.

भ्रष्टाचार ही समाजव्यवस्थेच्या मर्मावर हल्ला करणारी अत्यंत वाईट कृती असून भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे.

आजच्या या आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिनानिमित्त प्रत्येक स्तरावर पारदर्शकता राखण्याची प्रतिज्ञा करू, असे आवाहन नायडू यांनी आपल्या संदेशाद्वारे केले आहे.

Exit mobile version