कोरोना प्रतिबंधक लशीसंदर्भात आलेल्या सकारात्मक बातम्यांमुळे आशियायी शेअर बाजारांत तेजीचे वातावरण
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रतिबंधासाठीची अंतिम टप्प्यात असलेली लसनिर्मिती प्रक्रिया आणि काही ठिकाणी लशीच्या सुरु झालेल्या चाचण्या तसेच आज ८० देशांच्या राजदूतांचा होत असलेला हैद्राबाद दौरा या पार्श्वभूमीवर आशियायी शेअर बाजारांमध्ये आज सकाळपासून तेजीचे वातावरण होते.
मुंबईसह जपान, हॉंगकॉंग इथल्या शेअर बाजारातील निर्देशांक वधारले होते.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज सकाळच्या सत्रात आत्तापर्यंतची सर्वोच्च पातळी नोंदवीत २७० पूर्णांक ६१ अंकांनी वधारला आणि ४५ हजार ८७९ अंकांवर पोहोचला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही ७८ पूर्णांक २५ शतांश टक्क्यांची वाढ झाली आणि बाजार १३ हजार ४७१ अंकांवर पोहोचला.