चौकशी दरम्यान मुंबई पोलिसांकडून छळ होत असल्याचा अर्णव गोस्वामी यांचा आरोप
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : टीआरपी घोटाळा प्रकरणी चौकशी दरम्यान मुंबई पोलिसांकडून छळ होत असल्यामुळे या प्रकरणाचा तपास आणि कायदेशीर कारवाईला स्थगिती द्यावी आणि तपास सीबीआयकडे सोपवावा अशी विनंती करणारी याचिका, पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
टीआरपी घोटाळा प्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात प्राथमिक माहिती अहवाल नोंदवण्यात आला आहे. ए.आय.जी. आऊटलायर कंपनीच्या रिपब्लिक टीव्हीचा यामध्ये सहभाग असल्याच्या संशयावरून मुंबई पोलिसांनी चौकशी सुरू केली. मात्र, यात कर्मचाऱ्यांचा जाणीवपूर्वक छळ केला जात असल्याचा आरोप, अर्णब गोस्वामी यांनी आपल्या विनंती याचिकेत केला आहे.