Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शेतकरी आंदोलकांनी केंद्राचा प्रस्ताव फेटाळला, कृषी विधेयक मागे घेण्याचा हेका कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारकडून वारंवार तडजोडीसाठी पुढाकार घेतला जात असूनही शेतकरी नेत्यांनी आपला हेका कायम ठेवला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं दिलेला प्रस्ताव शेतकरी नेत्यांनी काल फेटाळून लावला. त्यामुळे आंदोलनाचा तिढा सुटणं कठीण झाल्याचं चित्र आहे.

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सिंघू आणि टिकरी सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे केंद्र सरकारनं तीन कायद्यांमधील बदलांबाबतचा आपला प्रस्ताव शेतकरी संघटनांकडे सुपूर्द केला आहे. मात्र, हे बदलही शेतकऱ्यांनी नाकारले आहे. त्यावर काल  शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. आतापर्यंत चर्चेचे 5 राऊंड झाले आहेत. आता आम्ही चर्चा करण्यास तयार नाही. तीन्ही कायदे रद्द करावीत. तरच आंदोलन मागे घेण्यात येईल, असं पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांच्या नेत्यांनी सांगितलं.

Exit mobile version