२०२१ मध्ये या टॉप ५ भारतीय स्टार्टअप्सवर राहील नजर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही दिवसात आपण नव्या वर्षात प्रवेश करणार आहोत, त्यामुळे भारतात उभे राहणारे स्टार्टअप २०२१ च्या स्वागताला, तंत्रज्ञान वृद्धी, नेतृत्व आणि आपल्या बिझनेस मॉ़डेलसह नव-नवीन यशशिखरे पादाक्रांत करण्यासाठी सज्ज आहेत. भारतातील स्टार्टअप इकोसिस्टिमने या संपूर्ण वर्षभरात विविध चढ-उतार पाहिले आहे. काही स्टार्टअप वाचले, काही गायब झाले, पण या सर्वांमध्ये काहींनी आपली कामगिरी आणि विकास करून उद्योगजगाला आश्चर्याचा धक्का दिला. साथीच्या काळातही २०२० मध्ये खूप चांगली कामगिरी दर्शवणाऱ्या पाच स्टार्टअपची माहिती खाली दिली आहे. २०२१ मध्ये त्यांचे भविष्य अधिक आशादायी असेल अशी अपेक्षा आहे.
१. फिनईन: भारतातील पहिले निओबँकिंग स्टार्टअप असलेल्या फिनईनने २०१९ मध्ये आपला प्रवास सुरु केला. पारंपरिक बँकिंग संस्थांपासून वेगळी, ग्राहक केंद्रित, एआय संचलित अशी ही निओबँक यूझर्ससाठी एंड-टू-एंड हायपर पर्सनलाइज्ड बँकिंगचे सोल्युशन प्रदान करते. ग्राहकांच्या खर्चाचे विश्लेषण करण्यासाठी हे स्टार्टअप एआयचा वापर करून, खर्च आणि बचतीच्या व्यवहारांवर प्रकाश टाकणारा अहवाल तयार करते. ‘फायनान्शिअल वर्ल्डची फिटबिट’ स्वरुपात माहिती उपलब्ध करून, हा प्लॅटफॉर्म यूझर्सला पैशांविषयीचा एक समग्र दृष्टीकोन प्रदान करतो. याद्वारे यूझर्सना अधिक बचत करणे, विचारपूर्वक खर्च करणे, अधिक गुंतवणूक करण्यास मदत करते. तसेच एखाद्याच्या वित्तीय सवयी समजून घेणे व त्या अधिक चांगल्या करण्याची समज याद्वारे प्रदान केली जाते. सुरक्षितता आणि गोपनीयतेची सुनिश्चिती हेत, हा स्टार्टअप ग्राहकांच्या संवेदनशील माहितीची सुरक्षा करणे तसेच त्याचा अनधिकृत वापर रोखण्यासाठी बँक-स्तरीय सुरक्षा, घोटाळाविरोधी आणि एन्क्रिप्शन सिस्टिमचा वापर करतो. तुम्हाला २०२१ मध्ये आर्थिक शिस्त लावून घ्यायची असेल तर हे अॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल कर आणि बिनधास्त रहा.
एचबिट्स:२०१९ च्या सुरुवातीला स्थापन झालेला हा स्टार्टअप एचबिट्स हा ग्रेड ए प्री-लीजच्या व्यावसायिक संपत्तीच्या अंशत: मालकीची सुविधा प्रदान करणारा एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे. गुंतवणुकदारांना अनेक मालमत्तांमधून निवड करून गुंतवणूक करण्यासाठी हा परवानगी देतो. त्यासह ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे वैयक्तिक सेवा मिळतात. अंशत: मालकी म्हणजे, ग्राहकांना ग्रेड ए च्या अचल संपत्तीत एक अंशाचे मालक बनता येते. त्याला त्या संपत्तीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एक वाटा आणि त्या संपत्तीची वाढती किंमत याचा लाभ मिळतो. एचबिट्ससोबत ग्राहकांना कमी किंमतीवर मजबूत संपत्तीचे मालक बनून मासिक उत्पन्न आणि भांडवलात वाढ करता येते. बाजारात सध्या अस्तित्वात असलेल्या उत्पन्न निर्माण करणा-या उत्पादनांच्या उलट, हा ब्रँड ग्राहकांना कागदी संपत्तीऐवजी हार्ड संपत्ती बनवण्यास सक्षम करतो. सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी असताना एचबिट्स हा ग्राहकांना अधिक लाभ प्रदान करण्यासह या क्षेत्रातील सुरक्षित गुंतवणुकीचा आनंदही प्रदान करतो.
३. स्पोक्टो: स्पोक्टो ही मोठी डेटा अॅनलिटिक्स कंपनी असून ती बँकिंग आणि वित्तीय सेवा उद्योगाशी संबंधित समस्या सोडवण्यास मदत करण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर करते. ही कंपनी बीएफएसआय डोमेनला ग्राहकांचे डिटेल्स व अंतर्दृष्टी प्रदान करते, ज्याद्वारे त्यांना ग्राहकांशी संपर्क साधता येईल तसेच दोषी खात्यांवरील वसुली वाढवता येईल. संपर्क केंद्र किंवा फील्ड कलेक्शनच्या पारंपरिक पद्धतीऐवजी, या पद्धतीच्या मदतीने बीएफएसआयच्या ग्राहकांकडून डेटा एकत्रित करून बीएफएसआय डोमेनला प्रदान करण्यास सक्षम असल्याने, त्यांचा खूप खर्च वाचतो. कारण संग्रहाचा खर्च डिजिटल स्वरुपामुळे सुमारे ३० टक्क्यांपर्यंत कमी होतो. यासह, ग्राहकांच्या वर्तणुकीबद्दल महत्त्वाची माहिती मिळाल्याने प्रत्येक ग्राहकाच्या स्कोअरनुसार, जे ग्राहक वसुली करण्याची शक्यता जास्त आहे, त्यांच्याशी संपर्क साधण्यास मदत होते. यामुळे त्यांच्या सध्याच्या सिस्टिमसह संचालनाची दक्षताही वाढते. हे सोल्युशन सध्या कोणत्याही तंत्रज्ञान कंपनीद्वारे बीएफएसआय डोमेनला दिले जात नाही, त्यामुळेच स्पोक्टो अशा प्रकारचे सोल्युशन प्रदान करणारा एकमेव प्रदाता आहे. यामुळे बीएफएसआय क्षेत्राला एनपीए समस्या सोडवण्यास मदत होईल व पर्यायाने अर्थव्यवस्थेचा वेगाने विकास होऊ शकतो.
४. मनीटॅप: मनीटॅप ही भारतातील पहिली अॅप-आधारीत क्रेडिट लाइन असून ती ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज वेगाने, किफायतशीर आणि लवचिक स्वरुपात प्रदान करते. अनेक शहरांमध्ये विविध क्षेत्रातील ग्राहकांना कर्ज घेण्याची प्रक्रिया सुलभ करत, मनीटॅप आशियाई फिनटेक क्षेत्रात एक नवी कॅटेगरी बनण्याचा तसेच कर्ज देण्याच्या प्रक्रियेत क्रांतिकारी बदल करण्याचा मार्ग प्रशस्त करत आहे. कंपनी या सर्व प्रक्रियांमध्ये कठोर नियम आणि प्रोटोकॉलचे पालन करते. उदा. कर्जाची मंजूरी देण्यापूर्वी केवायसी डिटेल्स जमवणे इत्यादी. कंपनीने नुकतेच एनबीएफसी लायसन्स मिळवले असून केवळ स्थापित आरबीआय-विनियमित भागीदार बँका आणि एनबीएफसीच्या मदतीने काम करत आहे. जेणेकरून सतत ग्राहक आणि हितधारकांसाठी या श्रेणीत सर्वोत्कृष्ट कर्ज उत्पादन बनण्याची वचनबद्धता पाळता येईल. २०२१ मध्ये आर्थिक सोल्युशनसाठी हा आपला मित्र आहे.
५. विविफाय: विविफाय ही भारतात सेवाविहीन समूहांना कर्जाची सहज आणि थेट प्रक्रिया उपलब्ध करून देणारा आरबीआय-प्रमाणित गैर-बँकिंग वित्त कंपनी (एनबीएफसी) आहे. ज्या ग्राहकांमध्ये कर्ज वसूल करण्याची क्षमता आणि इच्छा आहे, त्यांना लहान आकारातील कर्ज याद्वारे प्रदान केले जाते. या ग्राहकांच्या कर्ज परतफेडीच्या आधारे, कंपनी त्यांचे क्रेडिट स्कोअर वाढवण्यास मदत करते, जेणेकरून त्यांचा क्रेडिट स्कोअर अधिक चांगला होईल आणि अखेरीस ते जास्त कर्ज मिळवू शकतील. अनिल पिनापला (संस्थापक आणि सीईओ) आणि श्रीनाथ कोम्पेला (सह-संस्थापक आणि सीओओ ) नी २०१७ मध्ये या कंपनीची स्थापना केली होती. हैदराबाद येथील या कंपनीने उद्दिष्ट म्हणजे, कोणत्याही पक्षपाताविना सर्व पात्र भारतीयांना कर्ज उपलब्ध करून, स्थान, साक्षरता, मासिक उत्पन्न आणि क्रेडिट इतिहासाच्याच्या मर्यादा पार परत वित्तीय समावेशन प्राप्त करणे. फ्लेक्ससॅलरी आणि फ्लेक्सपे यासारख्या उत्पादनांचा उद्देश सेवाविहीन ग्राहकांवर लक्ष केंद्रीत करत तंत्रज्ञान आणि डेटा सायन्सचा लाभ देत, विविध क्रेडिट स्पेक्ट्रममध्ये ग्राहकांना अभिनव वित्तीय सोल्युशन प्रदान करणे हा आहे. विविफाय खरोखरच सर्वात चांगल्या वित्तीय समावेशाचे प्रतीक आहे.