आरटीजीएस सुविधाही २४ तास उपलब्ध करून देण्याचा रिझर्व बँकेचा निर्णय
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध करून दिल्यानंतर रिझर्व बॅंकेने आता आरटीजीएस सुविधाही २४ तास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. यामुळे उद्योगांना अधिक प्रभावी पद्धतीने पैशांचे व्यवहार करता येतील, असे रिझर्व बँकेने का प्रसिध्द केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
आरटीजीएसच्या माध्यमातून सध्या दररोज जवळपास ६ लाख ३५ हजार व्यवहार होतात.