देशातील कोविड रुग्ण बरे होण्याचा दर ९४ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला कोविड-१९ चे रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढत असून, तो आता ९४ पूर्णांक ८४ शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. काल दिवसभरात देशात ३७ हजार ५२८ रुग्ण बरे झाले, देशात आतापर्यंत ९२ लाख ९० हजार ८३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
काल २९ हजार ३९८ नवे रुग्ण आढळले, तर ४१४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९७ लाख ९६ हजार ७७० झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गाने १ लाख ४२ हजार १८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ लाख ६३ हजार ७४९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.