Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात आतापर्यंत १७ लाख ५३ हजार ९२२ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज ३ हजार ९४९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या एकूण रुग्णांची संख्या  १७ लाख ५३ हजार ९२२ झाली आहे. सध्या राज्यातला कोरोनामुक्तीचा दर ९३ पुर्णांक ४६ शतांश टक्क्यावर स्थीर आहे.

राज्य भरात आज ४ हजार २५९ नव्या रुग्णांचीही नोंद झाली. यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८ लाख ७६ हजार ६९९ झाली आहे. आज दिवसभरात ८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाबळींची एकूण संख्या ४८ हजार १३९ झाली आहे. सध्या राज्यभरात ७३ हजार ५४२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

सिंधुदुर्गात आज ६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे कोरोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५ हजार ७४  झाली आहे.  जिल्ह्यात आज २६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५ हजार ५७१ एवढी झाली आहे. सध्या जिल्ह्यात ३४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १५० असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

भंडारा जिल्ह्यात आज ७२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या १० हजार ६३० झाली आहे. आज ५४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११ हजार ४८९ झाली आहे. सध्या ५८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातली मृतांची एकूण संख्या २७१ झाली आहे.

गडचिरोली जिल्हयात आज ६६ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत ८ हजार २० रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. आज ३५ नवीन बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार ५०५ रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या ३९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात काल ४७, तर आतापर्यंत १९ हजार ६९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ४३ नवीन रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे जिल्ह्यातली रुग्ण संख्या २० हजार ७७१ झाली आहे. सध्या ३२१ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हिंगोली जिल्ह्यात काल ७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल दोन रुग्ण आढळले, त्यामुळे रुग्णांची संख्या ३ हजार ४३१ वर पोचली आहे. सध्या ५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजार १७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल १०२ नवीन रुग्ण आढळल्यामुळे, रुग्णांचा आकडा ५३ हजार ३१९ वर गेला आहे. सध्या १ हजार ३८५ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे १ हजार ७६० रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.

परभणी जिल्ह्यात काल २८ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ९१९ बरे झालेल्या रुग्णांना घरी पाठवले आहे. काल २३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे, रुग्ण संख्या वाढून ७ हजार ३४२ झाली आहे. सध्या १२९ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे २९४ रुग्णांचा बळी गेला आहे.

जालना जिल्ह्यात काल १०, तर आतापर्यंत ११ हजार ९९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. काल २४ नवीन बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे बाधितांची संख्या १२ हजार ७१२ झाली आहे. सध्या ३९९ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ३३२ रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत.

धुळे जिल्ह्यात काल २७ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोनामुक्त रुग्णाची एकुण संख्या १३ हजार ५४३ इतकी झाली आहे. जिल्ह्यात काल १२ नवीन कोराना बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे एकूण बाधितांची संख्या आता १४ हजार १०२ वर पोचली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १७८ इतकी आहे. जिल्ह्यात मृतांची एकुण संख्या ३८१ वर पोहचली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात काल ३०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ६१२ झाली आहे. काल १९५ नवीन रुग्णांची भर पडल्यामुळे, रुग्णांचा आकडा ६६ हजार १ वर पोचला आहे. सध्या १ हजार ४१५ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात या आजारामुळे ९७४ रुग्ण दगावले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात काल १०४, तर आतापर्यंत ४२ हजार ३७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ७० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे, जिल्ह्यातली बाधित रुग्णांची संख्या ४४ हजार २५० वर गेली आहे. सध्या ७०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार १६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वाशिम जिल्ह्यात काल ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार १३ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. काल २८ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे रुग्णांचा आकडा ६ हजार ३४६ वर गेला आहे. सध्या १८५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे १४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Exit mobile version