नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या खरीप हंगामाच्या खरेदीअंतर्गत केंद्र सरकारने ७० हजार कोटींहून अधिक रुपयांच्या भातपीकाची किमान आधारभूत किमतीने खरेदी केली आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे.
देशभरातल्या सुमारे ४० लाख ५३ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ झाल्याचे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.
महाराष्ट्र आणि पंजाबसह १५ राज्यांमध्ये भातपिकाची खरेदी सुरु आहे.
आत्तापर्यंत ३७२ लाख टन भातपिकाची खरेदी झाली असून, यापैकी २०२ लाख टन भाताची खरेदी एकट्या पंजाबमधून केली अशी माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे.
सध्याच्या किमान आधारभूत किंमत योजनेनुसार सरकार शेतमालाची खरेदी सुरुच ठेवणार असल्याचेही कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.