Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बारावीच्या परीक्षेसाठी, नियमित विद्यार्थ्यांना १५ डिसेंबरपासून अर्ज करता येणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी, नियमित विद्यार्थ्यांना १५ डिसेंबर ते चार जानेवारी दरम्यान, तर पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार, व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना, पाच जानेवारी ते १८ जानेवारीदरम्यान अर्ज करता येईल.

राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी, प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. खासगी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र कालावधी देण्यात येणार असल्यानं, या कालावधीत खासगी विद्यार्थ्यांनी अर्ज भरू नयेत, असं डॉ. भोसले यांनी स्पष्ट केलं.

Exit mobile version