Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध कुस्तीपटू; पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध कुस्तीपटू आणि पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं आज निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज सकाळी कोल्हापूरच्या एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

1949मध्ये पंजाब केसरी बनाता सिंग यांना पराभूत करत खंचनाळे यांनी हिंदकेसरीचा किताब पटकावत इतिहास रचला. त्याच वर्षी त्यांनी महाराष्ट्र केसरीची गदाही मिळवली. 1958, 1962 आणि 65मध्ये देखिल अखिल भारतीय अजिंक्य पदावर आपलं नाव कोरलं. कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीत त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले. त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version