नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वे मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या २१ रेल्वे भरती मंडळांमार्फत १ लाख ४० हजार रिक्त पदांसाठी महाभरती करण्यात येणार आहे.
रेल्वे भरतीची परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येईल. या परीक्षेसाठी देशात विविध राज्यांतून २ कोटी ४४ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
आजपासून, येत्या १८ डिसेंबेरपर्यंत या परीक्षेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात होणार असून, दुसऱ्या टप्प्यातल्या परीक्षा २८ डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान, तर एप्रिल २०२१ ते जून २०२१ दरम्यान तिसऱ्या टप्प्यातल्या परीक्षा होतील, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.
याच कालावधीत राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाकडून सुद्धा रिक्त पदांसाठी परीक्षा घेण्यात येतील. कोरोंना संकटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे काटेकोर नियम पळण्याबाबत उमेदवारांना सूचना देण्यात आल्या असून, यंत्रणांकडून आवश्यक खबरदारी घेण्यात येईल, अशी माहिती रेल्वे भरती मंडळाने दिली आहे.