डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच कोरोना संक्रमणावर नियंत्रण – भगतसिंह कोश्यारी
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळेच देश कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळवू शकत असल्याचं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.
मेडिकल अॅंड हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट असोसिएशनने आयोजित केलेल्या कोविड वॉरियर्सच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते.
समाजसेवक, पोलिस, स्वच्छता कामगार, आरोग्य सेवक आणि डॉक्टर्स यांचं राज्यपालांनी कौतुक केलं. यावेळी राज्यपालांनी मान्यवर डॉक्टरांचा सत्कार केला.