बहुतांश भारतीय विद्यार्थ्यांमध्ये अतिरिक्त भाषा शिकण्याची इच्छा: ब्रेनली
Ekach Dheya
मुंबई: ब्रेनली या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मने भारतीय यूझर्समध्ये एक सर्वेक्षण घेतले. विद्यार्थ्यांमधील प्राधान्य असलेली तसेच पसंतीची भाषा कोणती हे शोधण्यासाठी ‘पॉप्युलर फॉरेन लँग्वेज कंसिडर्ड बाय इंडियन स्टुडंट’ हे सर्वेक्षण घेण्यात आले. ३,२०६ विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया नोंदवलेल्या या सर्वेक्षणातून सर्वोत्तम जागतिक इकोसिस्टिम तयार करण्याकरिता शिक्षणात उत्कृष्ट भाषांचा समावेश असणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आले.
संबंधित प्रदेशाची भाषा शिकवणे ५५.५% शाळांमध्ये अपरिहार्य असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. यापैकी प्रादेशिक भाषा ४६.७ % शाळांमध्ये आवश्यक आहेत. तसेच, उर्वरीत ४४.५% शाळांमध्ये अशा प्रकारचे बंधन नाही. जवळपास, एक चतुर्थांश म्हणजेच २५.९% शाळांमध्ये विदेशी भाषा निवडणे बंधनकारक आहे. या निष्कर्षातून ब्रेनलीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त भाषा शिकण्याची इच्छा असल्याचे दिसून आले. पर्याय दिल्यास बहुतांश विद्यार्थ्यांनी एक तर विदेशी भाषा (३६.२ %) शिकणार असे सांगितले किंवा प्रादेशिक भाषेचा (३५.४%) पर्याय निवडला. २८.४% विद्यार्थ्यांनी प्रादेशिक भाषा शिकण्यात आवड नसल्याचे सांगितले. तर फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, मंदारीन आणि इतर (प्रादेशिक व विदेशी भाषांसह) भाषांना अनुक्रमे ३२.१%, ११.७%, १०.९%, ५.६% आणि ३९.७% पसंती दर्शवली.
८६% ब्रेनलीच्या सर्वेतील सहभागींनी इंग्रजी माध्यमातील शाळात शिकत असल्याचे सांगितले. तर ८.५% विद्यार्थ्यांनी हिंदी माध्यम घेतलेले आहे. उर्वरीत ५.५% विद्यार्थी प्रादेशिक भाषांसह इतर भाषांमधील माध्यमातून शिक्षण घेत आहेत. ५३.७% ब्रेनलीच्या यूझर्सनी शाळेत इंग्रजी ही दुय्यम भाषा म्हणून निवडलेली आहे तर ३५.३% विद्यार्थ्यांनी हिंदी व ११% विद्यार्थ्यांनी इतर प्रादेशिक भाषांची निवड केली आहे. विदेशी भाषांचा विचार केल्यास, २४.८% विद्यार्थ्यांच्या शाळेत फ्रेंच शिकवली जाते. त्यानंतर जर्मन (१०.७%), स्पॅनिश (८.१%) आणि मंदारीन (४.१%) शिकवली जाते. बहुतांश म्हणजेच तीन चतुर्थांश शाळा- ७२.४% शाळांमध्ये यापेक्षा वेगळ्या आंतरराष्ट्रीय भाषा शिकवल्या जातात.
ब्रेनलीचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर राजेश बिसानी म्हणाले, “आज देशभरात इंग्रजी आणि हिंदी या भाषांनी ब-यापैकी शिकण्याचे माध्यम म्हणून स्थान मिळवले आहे. तथापि, देशात इतर भाषांचीही मागणी दिसून येते. त्यामुळेच एक शिक्षणाचे उत्तम वातावरण निर्माण करायचे असल्यास, आपण कोणत्याही मागणीकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. यातून उत्कृष्ट पर्सनलायझेशन साधले जाते, त्यामुळे नव्या काळातील लर्निंग प्लॅटफॉर्मवर या उभरत्या समूहांच्या गरजा पुरवण्याची जबाबदारी आहे शिक्षणाचे लोकशाहीकरण करण्याची प्रक्रिया दीर्घकालीन आहे.”