Site icon साप्ताहिक एकच ध्येय

लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत.  या दौऱ्यात जनरल नरवणे या दोन देशांमधील लष्कर प्रमुख तसंच वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

भारतीय लष्कर प्रमुखांनी संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असून त्यामुळे या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. जनरल नरवणे आज आणि उद्या संयुक्त अरब अमिरातीच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी उभय देशांमधील  संरक्षणविषयक सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर 13 आणि 14 तारखेला ते सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असतील.

Exit mobile version