Site icon साप्ताहिक एकच ध्येय

१९७१ च्या भारत-पाक युद्ध विजयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा आज प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :भारत-पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युद्धात १६ डिसेंबर रोजी भारतानं विजय मिळवला आणि बांगलादेशाची निर्मिती झाली, हा दिवस आज विजय दिवस म्हणून साजरा होत आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज स्वर्णिम विजय मशाल प्रज्वलित करून भारत-पाक युद्धाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ केला. चार मशाली प्रधानमंत्र्यांनी प्रज्वलित केल्या असून, त्या देशाच्या कानाकोपऱ्यात फिरवल्या जाणार आहेत. तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रीय समर स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करुन या युद्धातल्या हुतात्म्यांना अभिवादन केलं.

बांगला देश युद्धातल्या या विजयाचं महत्व आणि त्यातून अधोरेखित झालेल्या युद्धनीतीबद्दल निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी सांगितलं.

Exit mobile version