नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या अधिक असल्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्याने वाढ
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसह केंद्र सरकारच्या केंद्रित धोरण आणि कृतीशील आणि योजनाबद्ध उपायांमुळे, भारताने रुग्ण बरे होण्याचा वाढता दर कायम राखला असून उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे आणि मृत्यूदरही कमी होत आहे.
नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या अधिक असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या सुमारे 95 लाख (94, 89,740) इतकी आहे. आज रुग्ण बरे होण्याचा दर 95.31% वर गेला आहे. बरे झालेले रुग्ण आणि उपचार सुरु असलेले रुग्ण यातील अंतर देखील सातत्याने वाढत आहे आणि सध्या ते 91,67,374 आहे.
बरे झालेल्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. सध्या देशात 3,22,366 रुग्णांवर उपचार सुरु असून हे प्रमाण एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 3.24 % आहे.
भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर जगातील सर्वाधिक दरांपैकी एक आहे. रुग्ण बरे होण्याचा जागतिक दर 70.27 टक्के आहे आणि भारताचा दर 95.31 टक्के आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया आणि इटलीचा रुग्ण बरे होण्याचा दर सर्वात कमी आहे.
18 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांचा रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे.
गेल्या 24 तासात देशात 33,291 रुग्ण बरे झाले.
यापैकी 75.63 टक्के रुग्ण दहा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. .
केरळमध्ये 5,728 रुग्ण बरे झाले असून ही सर्वाधिक संख्या आहे. महाराष्ट्रात काल 3,887 रुग्ण बरे झाले तर पश्चिम बंगालमध्ये 2,767 रुग्ण बरे झाले.
गेल्या 24 तासात 24,010 नवीन रुग्णांची नोंद झाली.
नवीन रुग्णांपैकी 78.27 टक्के रुग्ण दहा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
गेल्या 24 तासात केरळमध्ये 6,185 नवे रुग्ण आढळले. पश्चिम बंगालमध्ये 2,293 तर छत्तीसगडमध्ये 1,661 नवे रुग्ण आढळले.
गेल्या 24 तासात 355 जणांचा मृत्यू झाला असून यापैकी 79.15 टक्के मृत्यू दहा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
काल मृत्यू झालेल्यांपैकी 26.76 टक्के म्हणजेच 95 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये 46 तर दिल्लीत 32 जणांचा काल मृत्यू झाला.
भारतात दररोज होणाऱ्या मृत्यूची संख्या झपाट्याने घटत आहे. मृत्यू दर 1.45 टक्क्यांवर स्थिर आहे. भारताचा मृत्यू दर जगातील कमी मृत्युदरांपैकी एक आहे.