Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त प्रवेश परिक्षा JEE आता वर्षातून चारवेळा घेतली जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीची संयुक्त प्रवेश परिक्षा JEE आता वर्षातून चारवेळा घेतली जाणार आहे.

फेब्रुवारी, मार्च, एप्रील आणि मे महिन्यात परिक्षा होईल. त्यामुळे विद्यार्थ्याना आपल्या सोयीच्या वेळी परीक्षा देण तसंच पुन्हा परीक्षा देऊन गुण सुधारणं शक्य होईल असं शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी काल दिल्लीत सांगितलं.

फेब्रुवारीतली परिक्षा २३ ते २६ या तारखांदरम्यान होणार आहे. आता ही परीक्षा नव्या शैक्षणिक धोरणानुसार होणार असून प्रथमच मराठीसह १३ भारतीय भाषांमध्ये परीक्षा देता येणार आहे.

Exit mobile version