Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ आता महा-डीबीटी पोर्टलवरून एकाच अर्जावर मिळणार

मुंबई (वृत्तसंस्था) : कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर आपले अर्ज माहितीसह ३१ डिसेंबरपर्यंत सादर करावेत, असं आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

शेतकऱ्यांच्या सोयीकरिता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणं आवश्यक आहे.

त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीतलं संग्राम केंद्र अशा माध्यमातून शेतकरी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. ज्यांनी अद्याप महा डीबीटी पोर्टलवर अर्ज केला नसेल, त्यांना येत्या  ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.

Exit mobile version