Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नवी मुंबईत कोविड-१९ लसीकरणासाठी आवश्यक तयारी सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड १९ लसीकरणाचा पहिला टप्पा राबविण्यासाठीची आवश्यक तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवेशी निगडीत नवी मुंबई महानगरपालिका तसेच खाजगी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, कर्मचारी, आशा, अंगणवाडी शिक्षिका आणि मदतनीस तसंच वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी यांचं लसीकरण होणार आहे.

या लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज महापालिका मुख्यालयातील विशेष समिती सभागृहात टास्क फोर्स सभा झाली. महानगरपालिकेच्या ४२ केंद्रांमधील ४४९० कर्मचारी तसेच खाजगी वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत ९०४ संस्थांतील १२४३१ कर्मचारी यांची संगणकीकृत नोंद महानगरपालिकेकडे केली आहे.

कोविड १९ लसीकरण स्थळाच्या रचनेमध्ये प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष स्वतंत्र असणार असून एका केंद्रावर दररोज १०० व्यक्तींना लस दिली जाणार आहे.

Exit mobile version