Site icon साप्ताहिक एकच ध्येय

मुंबईत १ हजार ६९३ इमारती आणि १८० झोपडपट्ट्या टाळेमुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असल्याचं चित्र दिसत आहे. महापालिकेनं गेल्या दहा दिवसात १ हजार ६९३ इमारतींना आणि १८० झोपडपट्ट्यांना टाळे मुक्त केलं आहे.

मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून ५ हजार १८४ इमारती आणि ४४० झोपडपट्ट्या महापालिकेनं प्रतिबंधित म्हणून घोषित केल्या होत्या. सध्या ३ हजार ४९१ इमारती आणि २६० झोपडपट्ट्या प्रतिबंधित म्हणून कायम आहेत.

या प्रतिबंधित भागात जवळपास ३५ लाख म्हणजेच मुंबईच्या एकूण लोकसंखेच्या १७ टक्के लोकं राहत होते, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागानं दिली आहे. सध्या हा आकडा कमी होऊन २६ लाखांवर आला आहे.

म्हणजेच सध्या एकूण लोकसंख्येच्या १३ टक्के लोकं या प्रतिबंधित भागात राहत आहेत. सध्या मुंबईतला रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्के आहे. मुंबईत चाचण्यांचं प्रमाण वाढवल्यामुळे रुग्ण निदान लवकर होऊन वेळीच उपचार मिळाल्यामुळे हे दिलासादायक चित्र असल्याचं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version