मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक जगताप यांची नियुक्ती
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार अशोक उर्फ भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीनं काल त्यांच्या नावाची घोषणा केली. त्यांच्यासोबत माजी आमदार चरणसिंग सप्रा यांची कार्यकारी अध्यक्ष पदी तर नसीम खान मुंबईच्या प्रचार समितीचे अध्यक्ष असतील.
याशिवाय, माजी मंत्री सुरेश शेट्टी यांना जाहीरनामा समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं आहे. यासह मुंबई प्रदेश काँग्रेसच्या विविध समित्यांवरील अध्यक्ष आणि सदस्यांची घोषणाही काल करण्यात आली.