मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल दोन हजार ६४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १७ लाख ८३ हजार ९०५ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ६ दशांश टक्के झाला आहे. काल ३ हजार ८११ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या १८ लाख ९६ हजार ५१८ झाली आहे.
सध्या राज्यात ६२ हजार ७४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल ९८ रुग्णांचा मृत्यू झाला, राज्यात या विषाणू संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या, ४८ हजार ७४६ झाली आहे. राज्यातला मृत्यू दर २ पूर्णांक ५७ शतांश टक्के इतका आहे.
ठाणे जिल्ह्यात काल कोरोनाच्या ४०३ रुग्णांची, तर सात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या दोन लाख ३८ हजार ९३१ तर मृतांची संख्या पाच हजार ८७८ इतकी झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
नवी मुंबईत नव्याने ८८, कल्याण-डोंबिवलीत १०३, मीरा-भाईंदरमध्ये ३१, भिवंडीत पाच तर उल्हासनगरमध्ये ८ रुग्णांची नोंद झाली आहे. अंबरनाथमध्येही १२ तर बदलापूरमध्ये ३१रुग्ण दाखल झाले.
रत्नागिरी जिल्ह्यात काल ९ रुग्ण कोरणा मुक्त झाले काल १३ नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे रुग्णांची एकूण संख्या वाढून ९ हजार ५६ झाली आहे.
परभणी जिल्ह्यात काल १५, तर आतापर्यंत ७ हजार ४५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल १४ नवीन रुग्ण आढळले, त्यामुळे रुग्णांची संख्या ७ हजार ४७७ झाली आहे. सध्या १३५ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे २९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यात काल ४० रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत ५१ हजार ५ रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. काल २८ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे, एकूण बाधित रुग्णांची संख्या ५४ हजार ८८ झाली आहे. सध्या १ हजार २९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे १ हजार ७९१ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार ३७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात काल एकही नवीन रुग्ण आढळला नाही, त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या ३ हजार ४५७ वर स्थिर आहे. सध्या ५७ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
जालना जिल्ह्यात काल २२, तर आतापर्यंत १२ हजार २६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल २६ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे रुग्णांचा आकडा १२ हजार ९०४ वर गेला आहे. सध्या २९७ रुग्ण उपचाराधीन आहेत. जिल्ह्यात या आजारामुळे ३३८ रुग्ण दगावले आहेत.
वाशिम जिल्ह्यात काल १३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार १२५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल २७ नवे रुग्ण आढळले, त्यामुळे बाधितांची संख्या ६ हजार ५२० वर गेली आहे. सध्या २४६ रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४८ मृत्यूंची नोंद झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात काल ४१७ रुग्णांनी या आजारावर मात केली. काल ३२४ नव्या रुग्णांची नोंद झाली. जिल्ह्यात काल पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.