भारतीय पुरातत्व विभागानं संरक्षित स्मारकांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवरचे निर्बंध उठवले
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील भारतीय पुरातत्व विभागानं संरक्षित स्मारकांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवरचे निर्बंध उठवले आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या मानक कार्यप्रणालीनुसार हा निर्णय घेतला आहे.
मात्र, याठिकाणी प्रतिदिन पर्यटक संख्या ठरवण्याचा निर्णय पुरातत्व अधीक्षकांनी संबंधित जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांच्या संमतीनं घ्यायचा आहे. क्यू आर कोड तसच नेटवर्कची समस्या असणाऱ्या ठिकाणीच केवळ प्रत्यक्ष तिकीट विक्री करता येणार आहे. याव्यतिरिक्त इतर कार्यप्रणाली आधी जाहीर केलेल्या नियमानुसार सुरु राहील.