Site icon साप्ताहिक एकच ध्येय

थकीत वस्तू आणि सेवाकराच्या भरपाईपोटी केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून ६ हजार कोटी रुपयांचा आठवा हप्ता वितरीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थकीत वस्तू आणि सेवाकराच्या भरपाईपोटी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं सहा हजार कोटी रुपयांचा आठवा हप्ता वितरीत केला आहे. यापैकी ५ हजार ५१६ कोटी रुपये २३ राज्यांसाठी तर ४८३ कोटी रुपये दिल्लीसह जम्मू-काश्मीर आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांना मिळणार आहे. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि  सिक्कीम या पाच राज्यांत  जीएसटी भरपाईची थकबाकी नाही.

राज्यांना द्यायच्या एक लाख दहा हजार कोटी रुपयांच्या अंदाजित निधीची पूर्तता करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्यसरकारांसाठी विशेष कर्ज प्रणाली उभारण्यात आली असून सध्या वितरित केलेल्या आठव्या हप्त्यासाठी केंद्रानं ४ पूर्णांक १९ टक्के दरानं कर्ज  घेतलं आहे. तर आत्तापर्यंत एकूण ४८ हजार कोटींची रक्कम सरासरी ४ पूर्णांक ६९ टक्के व्याजानं घेतली आहे.

Exit mobile version