Site icon साप्ताहिक एकच ध्येय

शेतकऱ्यांचा विकास नको असणारे लोक नवीन कृषी कायद्यांना विरोध करत आहेत – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असून, देशाचा आणि शेतकऱ्यांचा विकास नको असणारे लोक त्यांना विरोध करत असल्याची टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचे ते म्हणाले. लोकभवन इथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

बाजार समित्या आणि किमान हमी भाव यांना कोणतीही बाधा पोचणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आणि नवीन कायद्यांमुळे शेतकरी देशात कुठेही शेतमाल विकू शकतील, असे सांगितले. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांनीच आखून दिलेल्या पावलांवर सरकार मार्गक्रमण करत असल्याचेही नमूद केले.

Exit mobile version