Site icon साप्ताहिक एकच ध्येय

29 डिसेंबर रोजी ऑनलाईन पध्दतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन -जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान

पुणे : राज्यातील युवकामध्ये एकात्मतेची भावना जागृत करणे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून युवा वर्गातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी केंद्र शासनामार्फत 1994 पासून दरवर्षी 12 जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. देशातील संस्कृती व परंपरा जतन करुन या संस्कृतीचे संवर्धन करणारा प्रातिनिधिक युवा संघ राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होतो.

महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन होवून स्पर्धक विभागस्तरावर सहभागी होतात. त्यातुन गुणी कलावंतांची निवड होवून राज्यस्तरावरील युवा महोत्सवासाठी विभागाचा संघ पाठविला जातो. सन 2020-21 या वर्षाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन कोविड – 19 च्या पार्श्वभुमीवर ऑनलाईन पदधतीने 29 डिसेंबर 2020 रोजी करण्यात येणार आहे. असे असे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी प्रसिदधी पत्रकान्वये कळविले आहे.

सन 2020-21 या वर्षाचे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन कोविड – 19 च्या पार्श्वभुमीवर ऑनलाईन पदधतीने 29 डिसेंबर 2020 रोजी करण्यात येणार आहे. यासाठी गुगल मीट या ॲपवर सदरचे जिल्हास्तरीय महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी आपले प्रवेश अर्ज दि. 27 डिसेंबर 2020 रोजी श्रीमती शिल्पा चाबुकस्वार, क्रीडा अधिकारी – 9552931119 या क्रमांकावर whatsapp द्वारे सादर करण्यात यावा. तसेच dsopune6@gmail.com  या मेल वर सादर करण्यात यावा. प्रवेश अर्ज सादर करताना त्यावर आपला व्हॉटसॅप क्रमांक असणे आवश्यक आहे. ज्या स्पर्धकांचे अर्ज दि. 27 डिसेंबर 2020 रोजी वरिल पर्यंत व्हॉटसॅप अथवा ई मेल वर येतीच त्याच स्पर्धकांना कला सादर करण्याकरीता व्हॉटसॅप क्रमांकावर लिंक पाठविण्यात येईल. स्पर्धा दि. 29 डिसेंबर 2020 रोजी राहील. या युवा महोत्सवामध्ये लोकनृत्य, लोकगीत, एकांकिका (हिंदी/इंग्रजी) शास्त्रीय गायन (हिंदुस्तान/कर्नाटकी)  शास्त्रीय वादन- सितार शास्त्रीय वादन- तबला, शास्त्रीय वादन-वीणा, शास्त्रीय वादन – मृदंग, हार्मोनियम वादन लाईट, गिटार वादन, शास्त्रीय नृत्य- मणिपुरी, शास्त्रीय नृत्य- ओडीसी, शास्त्रीय नृत्य- भरतनाट्यम, शास्त्रीय नृत्य- कथ्थक, शास्त्रीय नृत्य-कुचिपुडी, वक्तृत्व स्पर्धाचा समावेश आहे.

स्पर्धकांसाठी तसेच कलाकारांसाठी वयोगट 15 ते 29 वर्षे असा राहील. वय दि. 12 जानेवारी 2021 रोजी किमान 15 व जास्तीत जास्त 29 असावे. दि. 12 जानेवारी 1992 ते 12 जानेवारी 2006 या कालावधीत जन्म झालेला असावा. स्पर्धकाने नाव नोंदणी करताना प्रवेशिकेसोबत आपले आधार कार्ड व जन्माचा दाखला जोडणे आवश्यक आहे. यासाठी शाळेचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही, असे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी प्रसिदधी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version