पुणे विभागातील 5 लाख 31 हजार 513 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी,विभागात कोरोना बाधित 5 लाख 57 हजार 179 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव
Ekach Dheya
पुणे:- पुणेविभागातील 5 लाख 31 हजार 513 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 57 हजार 179 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 156 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 510 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.39 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 57 हजार 915 रुग्णांपैकी 3 लाख 41 हजार 298 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 974 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 643 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.36 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 848 रुग्णांपैकी 51 हजार 305 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 793 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 750 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 48 हजार 552 रुग्णांपैकी 45 हजार 752 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 108 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 692 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 439 रुग्णांपैकी 45 हजार 518 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 194 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 727 रुग्णांचा मृत्यू झाला आहे
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 425 रुग्णांपैकी 47 हजार 640 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 87 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 698 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 786 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 600 , सातारा जिल्ह्यात 69, सोलापूर जिल्ह्यात 82, सांगली जिल्ह्यात 21 तर कोल्हापूर जिल्ह्यात 14 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 145 आहे. पुणे जिल्हयामध्ये 783, सातारा जिल्हयामध्ये 173, सोलापूर जिल्हयामध्ये 143, सांगली जिल्हयामध्ये 35 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 11 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 32 लाख 10 हजार 456 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 57 हजार 179 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
( टिप :- दि. 23 डिसेंबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )