Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पॅरिस करारानुसार पर्यावरणीय निकषांचं लक्ष्य गाठणारा भारत हा जगातला मोठा देश – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅरिस करारानुसार पर्यावरणीय निकषांचं लक्ष्य गाठणारा भारत हा जगातला सर्वात मोठा देश आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज पश्चिम बंगालच्या शांतिनिकेतन इथल्या विश्वभारती विद्यापीठाच्या शतकमहोत्सवी सोहळ्याला दूरदृष्यप्रणालीद्वारे संबोधित करत होते.

गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या विश्वभारतीच्या दृष्टीची बीजे आत्मनिर्भर भारत संकल्पनेत आहेत, असंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री या विद्यापीठाचे कुलगुरु आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक तसंच पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनकर हे देखील या समारंभाला उपस्थित होते.

Exit mobile version