नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक नागपुरात दाखल
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला झालेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करायला केंद्राच पथक आज नागपुर जिल्ह्यात दाखल झालं. या पथकानं कामठी तालुक्यातल्या गुमथाळा या गावाला भेट दिली आणि शेतकऱ्यांकडून पूरपरिस्थितीची माहिती घेतली.
त्यानंतर पथकानं कामठीसह परशिवनी आणि मौदा तालुक्यातही पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. नागपूरसह पूर्व विदर्भात ऑगस्ट महिन्यात झालेल्या पूरस्थितीमुळे नागपूर जिल्ह्यातल्या पाच तालुक्यातली ६१ गावं, तर नागपूर विभागातल्या १४ तालुक्यातले ९० हजार ८५८ नागरिक बाधित झाले होते.
आज केंद्राची ३ पथकं पूर्व विदर्भातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. पहिलं पथक नागपुरात, दुसरं गडचिरोली तर तिसरं पथ चंद्रपूर जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.