नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची कोविड चाचणी क्षमता प्रतिदिन १५ लाखापर्यंत पोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे.
काल ९ लाख ९७ हजार नमुन्यांची चाचणी झाली. आतापर्यंत १६ कोटी ६३ लाख नमुन्यांची चाचणी झाली आहे. त्यात बाधित रुग्ण आढळण्याचं प्रमाण अडीच टक्क्यापेक्षा कमी आहे.कोरोनाविरोधी लढाईत देशानं आज आणखी एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला असून, आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांपैकी सध्या अॅक्टीव्ह असलेल्या रुग्णांचं प्रमाण २ पूर्णांक ७८ शतांश टक्क्यापर्यंत खाली आलं आहे.
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९५ पूर्णांक ७७ शतांश टक्क्यावर पोचलं आहे. काल २४ हजार पाचशे पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ९७ लाख १७ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सध्या देशभरात सुमारे २ लाख ८७ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत.काल सुमारे २३ हजार नवे रुग्ण आढळले, तर ३३६ रुग्णांचा मृत्यू झाला. कोविड मृत्यूचा दर सध्या १ पूर्णांक ४५ शतांश टक्के आहे.