शहरी भागातल्या नवीन स्वस्त धान्य दुकानांच्या मंजुरीवरची स्थगिती उठवण्याची छगन भुजबळ यांची घोषणा
Ekach Dheya
मुंबई (वृत्तसंस्था) : शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकानांवरील स्थगिती उठवणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
या मंजुरिंना २०१८ मध्ये स्थगिती देण्यात आली होती. ही नवीन अधिकृत स्वस्त धान्य दुकानं मंजूर करण्याबाबत धोरण, राज्यातली रद्द केलेली स्वस्त धान्य दुकानं, शहरी भागात नवीन दुकानांना देण्यात आलेली स्थगिती आदि विविध विषयांसंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी भुजबळ बोलत होते.
संपूर्ण शहर आणि लगतची उपनगरे यांचा विचार करुन शहरातील रास्त भाव धान्य दुकानांची स्थळं निश्चिती करण्यासाठी आराखडा तयार करावा. या आराखड्यावर प्रचलित दुकानं, बंद असलेली दुकानं, प्रस्तावित दुकानं अशी सर्व दुकानं प्रथम एकांकासह नोंदवावी, असे निर्देशही त्यांनी दिले.