नवी दिल्ली : देशाचे समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी सरकार आणि नागरी समाज संघटनांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.
वास्तूकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या इमारतींचे जतन करण्याबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी सरकार आणि नागरी संस्थांनी काम करावं यावर त्यांनी भर दिला. त्यांनी आज रविंद्रनाथ टागोर यांचे ऐतिहासिक निवासस्थान ‘श्यामोली’ देशाला समर्पित केले. त्यावेळी ते बोलत होते. शांतीनिकेतन येथे 1935 साली बांधण्यात आलेला ‘श्यामोली’ हे प्रायोगिक मातीचे घर आहे. अलिकडेच पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या घराचे नुतनीकरण केले.