Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या गुजरातमध्ये सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेकने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या गुजरातमध्ये सुरू करण्यात आल्या असून साडेसातशे जणांना पहिली मात्रा देण्यात आली.

त्यानंतर त्यांच्यात कुठलेही वाईट परिणाम दिसून आले नाहीत,असे वरिष्ठ डॉक्टरांनी रविवारी सांगितले.ज्यांना लशीची पहिली मात्रा देण्यात आली त्यांच्यात ७५० स्वयंसेवक असून डॉक्टर,परिचर कर्मचारी, निम-वैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश आहे.

कोव्हॅक्सिन लशीच्या चाचण्या २५ नोव्हेंबरला सुरू करण्यात आल्या होत्या.दरम्यान स्वयंसेवकात कुठलेही वाईट परिणाम दिसून आले नाहीत,असे क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉ.किरण रामी यांनी सांगितले.आणखी हजार जणांना या महिन्याच्या अखेरीस लस देण्यात येणार असून काही जणांना २८ दिवसांच्या अंतरानंतरची दुसरी मात्रा देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.आतापर्यंत १५ जणांनी लस घेतली आहे.त्यांना लसीकरणाचे वेळापत्रक देण्यात आले होते.

Exit mobile version