Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारतीय उद्योजकांनी विश्वस्तरीय मानकांनुसार उत्पादनं तयार करावीत असं पंतप्रधानांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय उत्पादनांचाच वापर करण्याच्या दिशेनं मोठ्या प्रमाणात वैचारिक परिवर्तन होत असून या परिवर्तनाच्या परिणामांचा अंदाज घेणं भल्या भल्या अर्थतज्ज्ञांनाही कठीण जाईल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या मन की बात मधून केलं.

आम्ही स्वदेशी उत्पादने वापरू पण ती तुम्हीही दर्जेदार बनवा ही ग्राहकांची सूचना उत्पादकांनीदेखील गांभिर्याने घ्यावी असं ते म्हणाले.कधी ध्यानी मनीही नसलेल्या गोष्टी सरत्या वर्षानं दाखवल्या,शिकवल्या.कोरोनाच्या साथीमुळे अनेक संकटं आली, सगळे व्यवहार थंडावल्याचा परिणाम वस्तूंच्या पुरवठ्यावर झाला.पण प्रत्येक संकटातून बोध घेत आपण नव्या जोमानं त्यांचा सामना केला.यातूनच देशाला नवं बळ मिळालं.त्याचंच दुसरे नाव आहे आत्मनिर्भरता असं पंतप्रधान म्हणाले.

अर्जुनाच्या जिज्ञासेतून गीतेचा जन्म झाला असं सांगून गीता जयंतीच्या निमित्तानं बोलताना,जोवर जिज्ञासा आहे तोवरच जीवनात ऊर्जा आहे हे लक्षात ठेवा असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

“गीता, हमें, हमारे जीवन के हर सन्दर्भ में प्रेरणा देती है। लेकिन गीता की विशिष्टता ये भी है कि ये जानने की जिज्ञासा से शुरू होती है। गीता की ही तरह, हमारी संस्कृति में जितना भी ज्ञान है, सब, जिज्ञासा से ही शुरू होता है। वेदांत का तो पहला मंत्र ही है-‘अथातो ब्रह्म जिज्ञासा’ अर्थात, आओ हम ब्रह्म की जिज्ञासा करें। जिज्ञासा आपको लगातार नए के लिए प्रेरित करती है। यानी जब तक जिज्ञासा है, तब तक जीवन है। जब तक जिज्ञासा है, तब तक नया सीखने का क्रम जारी है। इसमें कोई उम्र, कोई परिस्थिति, मायने ही नहीं रखती।“

देशात बिबट्यांची संख्या वाढली आहे, ही वाढ महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटकात जास्त आहे, पट्टेदार वाघांची संख्याही वाढली आहे, वनक्षेत्र सुद्धा विस्तारलं आहे, हे केवळ सरकारचं यश नाही.अनेक संस्था आणि व्यक्तींचा हातभार लागला असं आवर्जून सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मधून या सर्वांचं अभिनंदन केलं.औषधीगुणांनी युक्त अशा सुगंधी काश्मीरी केशराला भौगोलिक मानांकन मिळाल्याचा उल्लेख करून त्याचा लाभ काश्मिरात केशराची शेती करणाऱ्यांना होत असल्याचं मोदी यांनी सांगितलं. तुम्हाला केशर घ्यायचे असेल तर काश्मीरचंच घ्या असं आवाहनही केलं.

देशभरातून आलेल्या पत्रांच्या उल्लेखानं आजच्या मन की बात ची सुरूवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली दखल घेतली ती,नववर्षानिमित्त यंदा देशालाच देऊ या शुभेच्छा ! या कोल्हापुरातून अंजली यांनी पाठवलेल्या सूचनेची.भारत बलवान होवो, यशस्वी होवो,हीच खरी शुभेच्छा ! असं ते म्हणाले. मुक्याप्राण्यांसाठी जीवदयेतून राबवले जाणारे उपक्रम,युवा ब्रिगेडनं केलेला कर्नाटकातल्या वीरभद्रस्वामी मंदिराचा जीर्णोद्धार, शिक्षणाचे ऑनलाईन प्रयोग,लुप्त होत चाललेली कोरवा भाषा जगवण्याचा प्रयत्न,अशी काही उदाहरणं देत आपण हे करू शकतो आणि करणारच ही जिद्द महत्वाची असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं.

स्वच्छतेसाठीच्या विविध उपक्रमांच्या यशाचे दाखले देत, पंतप्रधानांनी काल ‘मन की बात’ मधून प्लास्टिकमुक्त भारताचा संकल्प सोडण्याचं आवाहन केलं.कोरोना काळात स्वच्छ भारताची चर्चा जास्त झाली नाही.आता आधी आपण कचरा करायचा नाही असा नववर्षाचा संकल्प करायला हवा असं ते म्हणाले.नववर्षाच्या शुभेच्छा देत. स्वतःची, परिवाराची तब्येत सांभाळण्याचं आवाहन करत आणि पुढच्या वर्षी पुन्हा भेटूच असं आश्वासन देत पंतप्रधानांनी कालच्या ‘मन की बात’ ची सांगता केली.

Exit mobile version