पुणे शहराच्या हद्दीलगतची २३ गावं पालिकेत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू
Ekach Dheya
पुणे: पुणे शहराच्या हद्दीलगतची २३ गावं पालिकेत समाविष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गावांत आवश्यक तेवढी आरोग्य यंत्रणा उभारण्यात येणार असून,पुणे शहराप्रमाणे या गावांतील नागरिकांच्या कोरोना चाचणीसाठी काही ठिकाणी स्वॅब कलेक्शोन सेंटरही सुरू केले जाणार आहेत अशी माहिती सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉक्टर संजीव वावरे यांनी दिली.
२३ गावाच्या पालिकेत समावेशाची प्रारुप अधिसुचना राज्यसरकारनं काढली आहे.या गावाबाबत विभागीय आयुक्तांकडील सूचना, हरकती जाणून घेतल्यानंतर महिनाभराने महापालिकेचा प्रशासकीय कारभार सुरू होणार आहे.