Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोना काळात मान्यता नसतानाही सुरू केलेल्या शाळांवर तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवण्याचे निलम गोऱ्हे यांचे निर्देश

पुणे : कोरोना काळात मान्यता नसलेल्या शाळा सुरू करणं हा गंभीर गुन्हा असून त्याबाबत तात्काळ फौजदारी गुन्हा नोंदवावा आणि शिक्षण विभागानं त्यावर तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत.

पिंपरी चिंचवड इथं पालकांशी संवाद साधताना काही पालकांनी हा मुद्दा उपस्थित केला, त्यावेळी गोऱ्हे यांनी हे निर्देश दिले. शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा आणि परिसर सॅनिटाइज करून घ्याव्यात.

त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून आवश्यक साहित्य विकत घ्यावं, राज्याच्या बोर्ड परीक्षेला जसे फॉर्म नंबर १७ चालतो तसा तो सीबीएसई,आईसीएससी या केंद्रीय बोर्डांच्या शाळांबाबत चालेल का याबाबत शिक्षण विभागानं केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशा सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी दिल्या.

Exit mobile version