लडाखमध्ये नव्या हवामान केंद्राचं आज हर्षवर्धन यांच्या हस्ते उद्घाटन
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते आज केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये नव्या हवामान केंद्राचं उद्घाटन होणार आहे.
आतापर्यंत हवामानाच्या अंदाजासाठी श्रीनगर इथलं भारतीय हवामान केंद्र संरक्षण दलांनी दिलेल्या माहितीवर अवलंबून होता. आता लेह, कारगिल, द्रास आणि स्ताकना इथं भारतीय हवामान विभागाची स्वयंचलित हवामान केंद्र असतील. या केंद्रांवरून दर १५ मिनिटांनी हवामानाबाबतची ताजी माहिती मिळणार आहे.