केंद्र सरकारचा राज्यांना ६ हजार कोटींचा जीएसटी परतावा
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा कर, म्हणजेच जीएसटी भरपाईतली तूट भरून काढण्यासाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ६ हजार कोटींचा नववा साप्ताहिक हप्ता राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना वितरीत केला आहे.
यापैकी २३ राज्यांना ५ हजार ५१६ कोटी रुपये, तर ३ केंद्रशासित प्रदेशांना ४८३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम या राज्यांच्या जीएसटी महसुलात तूट नाही.
केंद्र सरकारनं ऑक्टोबर महिन्यात राज्यांच्या वतीनं १ लाख १० हजार कोटी रुपयांचं कर्ज घेऊन ते राज्यांना टप्प्याटप्प्यात वितरीत करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत केंद्र सरकारनं सरासरी ४ पूर्णांक ७६ शतांश टक्के दरानं ५४ हजार कोटी रुपयांचं कर्ज घेऊन त्याचं वितरण केलं आहे.