Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जिल्हानिहाय कोरोना अहवाल

मुंबई (वृत्तसंस्था): रत्नागिरी जिल्ह्यात काल २१, तर आतापर्यंत ८ हजार ६९७ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत काल बारा नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णसंख्या ९ हजार १८६ झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यात काल दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले जिल्ह्यात आतापर्यंत ३४०५ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत काल २ नवीन रुग्ण आढळले त्यामुळे रुग्ण संख्या तीन हजार ५०७ वर गेली आहे सध्या एकूण ५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जालना जिल्ह्यात काल १४ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार ४५४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.काल २० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव आल्यामुळे, रुग्णसंख्या १३ हजार १११ वर पोचली आहे. सध्या ३१२ रुग्ण उपचार घेत आहेत.

परभणी,जिल्ह्यात काल बरे झालेल्या १६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार १७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.काल ८ रुग्णांना या आजाराची लागण झाल्यामुळे, रुग्ण संख्या वाढून ७ हजार ५६३ झाली आहे. सध्या १०२ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.जिल्ह्यात या आजारामुळे ३०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वाशिम जिल्ह्यात काल ७ तर आतापर्यंत ७ हजार २२१ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत.काल १५ नवीन रुग्ण आढळल्यामुळे,रुग्णांचा आकडा ६ हजार ६४० वर गेला आहे.सध्या २७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.जिल्ह्यात या आजारामुळे १४८ रुग्णांनी आपला प्राण गमावला आहे.

सातारा जिल्ह्यात काल १७६,तर आतापर्यंत ५१ हजार ७८१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.काल ७८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे,रुग्णसंख्या ५४ हजार ६५४ वर गेली आहे.सध्या १ हजार ७८ रुग्ण उपचार आधीन आहेत.जिल्ह्यात या आजारामुळे १ हजार ७९५ रुग्ण दगावले आहेत.

Exit mobile version