केंद्रीय मंत्रीमंडळाने आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या निर्यातीला दिली परवानगी
Ekach Dheya
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या निर्यातीला केंद्रीय मंत्रीमंडळानं परवानगी दिली आहे.
आकाश हे क्षेपणास्त्र डागण्यासाठी लागणाऱ्या प्लॅटफॉर्मची निर्मिती पुण्याच्या संशोधन आणि विकास संस्थेनं केली आहे.आत्मनिर्भर भारत या मोहमेअंतर्गत देशी बनावटीची क्षेपणास्त्र तयार करण्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या प्रयोगशाळा सध्या आघाडीवर आहेत.
जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या आकाश या क्षेणास्त्राची निर्मिती २०१४ मध्ये करण्यात आली.याच वर्षी ते हवाई दलात दाखल करण्यात आले; तर २०१५ मध्ये लष्करात दाखल झालं.आकाश ची मारक क्षमता २५ किलोमिटर इतकी आहे.
आकाश क्षेपणास्त्र भारतीय संरक्षण दलात दाखल झाल्यावर कही मित्र देशांनी ते खरेदी करण्याची तयारी दाखवली होती; त्यानंतर आता केंद्र सरकारनं आकाशच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे निर्यात करण्यात येणार आकाश क्षेपणास्त्र आणि भारतीय संरक्षण दलात वापरण्यात येणारं आकाश या दोन्हींच्या तंत्रज्ञानात फरक आहे.
संरक्षण सामुग्रीची ५ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी निर्यात करण्याचं केंद्र सरकार लक्ष असून या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे भारतात तयार होणाऱ्या संरक्षण विषयक उत्पादनाच्या निर्यातीला चालना मिळणार आहे.या माध्यमातून मित्र देशांशी सामरिक संबंध सुधारण्याचेही केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत.