Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्राप्तीकर तसेच जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्राप्तीकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत १० जानेवारी २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

लेखा परीक्षण आवश्यक असलेले करदाते आणि कंपन्यांना येत्या १५ फेब्रुवारी पर्यंत कर विवरण पत्र भरता येणार आहे.विवरण पत्र भरण्याला मुदतवाढ देण्याची यंदाची ही तिसरी वेळ आहे.

वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीचे वार्षिक विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदतही दोन महिने वाढवण्यात आली आहे.आता या व्यावसायिकांना २८ फेब्रुवारीपर्यंत विवरणपत्र दाखल करता येईल. ‘विवाद से विश्वास तक’ योजनेनुसार नागरिकांनी स्वत:हून संपत्तीचा खुलासा करण्याची मुदतही ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.

Exit mobile version